esakal | सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Married-woman-suicide

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळवृत्त सेवा

कोपरगाव (जि. नगर) : धारणगाव (ता. कोपरगाव) येथील राणी किरण चंदनशीव (वय १९) या नवविवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. राणीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. (Married-woman-suicide-due-to-harassment-ahmednagar-marathi-news)

हुंड्यासाठी घेतला बळी?

धारणगाव येथील किरण भाऊसाहेब चंदनशीव याच्याशी अडीच महिन्यांपूर्वी राणीचा विवाह झाला होता. तिच्या वडिलांनी लग्नात ५० हजार रुपयांचा हुंडा दिला नाही, लग्न चांगले करून दिले नाही, असे म्हणत आरोपींनी राणीचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्यातून ती आजारी पडली. आठ जुलैला दुपारी बारादरम्यान गोदावरी नदीपात्रात तिचा मृतदेह आढळला. पोलिसांनी पती किरण साहेबराव चंदनशीव, सासू विठाबाई ऊर्फ मंदा साहेबराव चंदनशीव, सासरा साहेबराव जगन्नाथ चंदनशीव, लक्ष्मण साहेबराव चंदनशीव (सर्व रा. धारणगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस ठाण्यात दत्तात्रय साठे यांनी तक्रार दिली आहे. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा बळी घेतल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

(Married-woman-suicide-due-to-harassment-ahmednagar-marathi-news)

हेही वाचा: कोविडने पुसले अडीचशे महिलांचे कुंकू! अनेक संसार उद्‌ध्वस्त

हेही वाचा: निघोजमध्ये आठ दिवस लॉकडाउन; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

loading image