

Pune–Nashik Highway Chokes: Endless Lines of Vehicles Amid Road Work
Sakal
संगमनेर : पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे रविवारी (ता.२३) बोटा ते घारगाव (ता. संगमनेर) दरम्यान वाहतूक कोंडी झाली होती. सकाळपासून दुपारपर्यंत ही वाहतूक कोंडी होती. टोल भरूनही दररोज कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने वाहनचालकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. ही अखंड कोंडी थांबणार तरी कधी? असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.