esakal | अहमदनगर : भोसले-पठारे टोळीतील 11 जणांवर मोक्काची कारवाई | Crime News
sakal

बोलून बातमी शोधा

crime

अहमदनगर : भोसले-पठारे टोळीतील 11 जणांवर मोक्काची कारवाई

sakal_logo
By
गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : दरोडे, रस्ता लूट, घरफोड्या करण्यासाठी कुविख्यात असलेल्या राहुल निवाश्‍या भोसले (रा. सारोळा कासार) आणि विजय राजू पठारे (रा. सिद्धार्थनगर, नगर) या दोघांच्या टोळीतील 11 सदस्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अन्वये कारवाईस नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी मंजुरी दिली आहे. या दोन्ही टोळीविरुद्ध अहमदनगर येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

राहुल निवाश्‍या भोसले (वय 22) हा 2013 पासून गुन्हेगारी क्षेत्रात आला आहे. तो फसवणूक करून दरोडे टाकण्याची त्याची कार्य पद्धती होती. त्याने दरोडे टाकण्यासाठी पाच जणांची टोळी तयार केली होती. या टोळीमध्ये उरूस ज्ञानदेव चव्हाण (वय 33, रा. बुरुडगाव, ता. नगर), दगू बडूद भोसले (वय 27, रा. पडेगाव, ता. कोपरगाव), निवाश्‍या चंदर उर्फ सीताराम भोसले (रा. सारोळा कासार, ता. नगर), पप्या मोतिलाल काळे (रा. पैठण, जि. औरंगाबाद) यांच्या टोळीने 12 दरोडे टाकले आहेत. त्यापैकी सहा दरोडे नगर तालुक्‍यात तर कोपरगाव तालुक्‍यात पाच तर संगमनेर तालुक्‍यात एक दरोडा टाकला आहे. नगर तालुका पोलिस ठाण्यात ता. 15 एप्रिल रोजी टाकलेल्या दरोड्याचा तपास नगर तालुका पोलिसांनी केला. पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी या गुन्ह्यात मोक्का कारवाईसाठी प्रस्ताव पाठविला होता.

हेही वाचा: अहमदनगर : 13 वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार, गुन्हा दाखल

शहरातील सिद्धार्थनगर भागात राहणारा विजय राजू पठारे (वय 40) हा 2012 पासून गुन्हेगारी क्षेत्रात आला आहे. त्याने आरोपी अजय राजू पठारे (वय 25), बंडू उर्फ सुरज साहेबराव साठे (वय 22), अनिकेत विजू कुचेकर (वय 22), प्रशांत उर्फ मयूर राजू चावरे (वय 24) आणि अक्षय गोविंद शिरसाठ (वय 23, सर्व रा. सिद्धार्थनगर) यांच्या मदतीने टोळी तयार केली होती. बेकायदा घरात घुसणे, मारहाण करणे, दरोडे, खुनी हल्ले करणे असे 12 गुन्हे पठारे याच्या टोळीने केले आहेत. या टोळीने ता. 20 मार्च रोजी बालिकाश्रम रस्त्यावर दुकानदारांना खंडणीसाठी मारहाण केली होती. तोफखाना पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे आणि त्यानंतर प्रभारी उपअधीक्षक अजित पाटील यांनी मोक्का कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावाला मोक्कान्वये मंजुरी मिळाली आहे.

हेही वाचा: अहमदनगर जिल्ह्यात सोयाबीनची नासाडी; शेंगांना फुटले कोंब

loading image
go to top