उद्योग, व्यवसाय उभारा पण जमीनी विकू नका; ठाकर समाजाचे मेंगाळ यांची विनंती

Meeting of Thackeray community at Uddavane
Meeting of Thackeray community at Uddavane

अकोले (अहमदनगर) : शेंडी मार्गे घाटघरहून मुंबईला जोडणाऱ्या रस्त्यामुळे येणारे पर्यटक आपल्या मार्गे येणार असल्याने घाटघर, शिंगणवाडी, पांजरे, उडदावने या भागातील ठाकर समाजाने या रस्त्यालगत असणाऱ्या जमिनीत जोड व्यावसाय उभारावा, परंतु, जमीन विकू नका, असे प्रतिपादन ठाकर समाजाचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ मेंगाळ यांनी केले. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
उडदावणे (ता. अकोले) येथे ठाकर समाजाच्या समस्या व व्यथा जाणून घेण्यासाठी आयोजित विचारमंथन बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. उडदावणेचे उपसरपंच शांताराम गिर्हे उपस्थित होते. मेंगाळ म्हणाले की, समाजाचे संघटन, एकी हीच आपल्या समस्या सोडवू शकते. त्यामुळे सर्वांनी एक राहावे असे आवाहन त्यांनी केले.

सामाजिक कार्यकर्ते बच्चू गांगड म्हणाले की, समाजाच्या समस्या व व्यथा सोडवूनच आपल्याला पुढे जावे लागणार आहे. त्या दृष्टीने संघटनेला काम करावे लागेल. विद्यार्थी नेते मदन पथवे म्हणाले की, आदिवासी ठाकर समाजात होणारी जात व सामाजिक घुसखोरी बाबतचे महत्व पटवून देऊन काम करीत आहे. सोमा उघडे यांनी चाळीसगाव डांगण भागातील ठाकर समाज हा आपल्या पाठीशी आहे असे सांगितले. डॉ. भाऊराव उघडे, तुळशीराम कातोरे, दीपक पथवे, भरत मेंगाळ, पांडुरंग पथवे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संजय मेंगाळ तर सुत्रसंचलन राहुल गावंडे यांनी केले. 

शांताराम मेंगाळ, बाळासाहेब मेंगाळ, अशोक पोकळे, देविदास पोकळे, संजय गिर्हे, विलास आगीवले, अंकुश गांगड, गोकुळ गिर्हे, गोविंद हिंदोळे, रामा घोगरे, भाऊ गिर्हे, लताबाई मेंगाळ आदी उपस्थित होते. 

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com