esakal | मोदी सरकारची झुंजार खेळी, पेट्रोलचा स्कोर १०१, सिलेंडर ८००! मीम्स तुफान व्हायरल

बोलून बातमी शोधा

Memes on social media against Modi government due to fuel price hike}

खाद्यतेलांसह डाळी, शेंगदाणे अशा अनेक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. कोरोनाच्या संकटातून सावरताना वाढत्या महागाईसोबत लढाई सुरू आहे.

मोदी सरकारची झुंजार खेळी, पेट्रोलचा स्कोर १०१, सिलेंडर ८००! मीम्स तुफान व्हायरल
sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर ः इंधनासह वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांबरोबरच व्यावसायिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. पेट्रोल- डिझेलसह खाद्यतेलांचे दर पुन्हा वाढल्याने खिशाला कात्री लागत आहे. पेट्रोल- डिझेलचे दर वाढल्याने प्रवासखर्च महागला आहे. अनेक व्यावसायिकांच्या दैनंदिन खर्चात वाढ झाली आहे. मालवाहतुकीच्या दरातही दहा टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे.

मोदी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी महागाईवर टीका करीत होते. परंतु त्यांच्या काळात पेट्रोल आणि गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियात मीम्स बनवले जात आहेत. मोदी सरकारची दमदार खेळी, पेट्रोल १०१ रूपये, मोदी है तो रिस्क है.. अशा स्वरूपाची टिपण्णी सुरू आहे. या मीम्स मोदी समर्थकांकडून उत्तर दिले जात आहे. पंतप्रधानांसारख्या व्यक्तींबाबत असे मीम्स तयार करणे चुकीचे असल्याचाही सूर सोशल मीडियात उमटत आहे.

हेही वाचा - नेमका कोरोना माझ्या लग्नातच आडवा येतो राव

खाद्यतेलांसह डाळी, शेंगदाणे अशा अनेक वस्तूंच्या किमती वाढत आहेत. कोरोनाच्या संकटातून सावरताना वाढत्या महागाईसोबत लढाई सुरू आहे. गेल्या काही दिवसांत अनेक वस्तूंच्या किमती वाढल्याने रोजचे जगणे महागले आहे. विविध खाद्यपदार्थ बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचेही दर वाढत आहेत. लॉकडाउन काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर काहींची पगारकपात झाली. बॅंकेच्या ठेवींवरील व्याजदरातही घसरण झाल्याने, रोजचा खर्च भागविणे अवघड बनले आहे. अनेक ज्येष्ठांना औषधींचा खर्चही परवडेनासा झाला आहे. शहरासह ग्रामीण भागातील मजुरांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व जण महागाईशी लढत आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती आवाक्‍याबाहेर गेल्याने गृहिणी संताप व्यक्त करीत आहेत. काही वर्षांपूर्वी 325 ते 350 रुपयांना मिळणारे गॅस सिलिंडर आठशे रुपयांजवळ पोचले आहे. यापूर्वी गॅससाठी सरकारी अनुदान मिळत होते. त्यामुळे गॅसच्या किमतीही कमी होत्या. मात्र अनुदानही बंद झाल्याने गॅस सिलिंडरसाठी 770 रुपये मोजावे लागत आहेत. 
......... 
चौकट 

कच्चा माल महागल्याने उद्योजकही आर्थिक अडचणीत सापडले आहेत. वाढत्या महागाईमुळे उद्योजकांनी उत्पादन कमी केले आहे. ग्राहकवर्ग खरेदीसाठी हात आखडता घेत आहे. वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका बांधकाम व्यवसायाला बसल्याचे नगरसेवक अंजूम शेख सांगतात. 
.......... 

देशातील तेलबियांच्या उत्पादनाचा तुटवडा निर्माण झाल्याने त्यांची आयात वाढविली आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली. मध्यंतरी कमती कमी होत्या; परंतु आता पुन्हा खाद्यतेलाचे दर पाच टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. एक किलो सोयाबीन तेलासाठी सध्या 125 ते 130 रुपये मोजले लागत असून, सूर्यफूल तेल 160, शेंगदाण्याचे तेल 165 रुपये आहे. 
- मुकेश न्याती, तेल व्यावसायिक