
श्रीरामपूर: जिममध्ये जाणाऱ्या तरुणांना व नशेसाठी वापरले जाणारे मेफेन्टरमाइन इंजेक्शन परवाना नसताना विकणाऱ्या महिला व तिच्या साथीदारावर श्रीरामपूर शहर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला. ही अवैध इंजेक्शन विक्रीविरोधातील आतापर्यंतची दुसरी मोठी कारवाई ठरली आहे.