esakal | सावधान, दुधात होतेय भेसळ! राहुरीत दोन संकलन केंद्रावर छापा

बोलून बातमी शोधा

Milk was adulterated at Rahuri!}

राहुरीत दूध संकलन केंद्र भेसळ करतात. त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

सावधान, दुधात होतेय भेसळ! राहुरीत दोन संकलन केंद्रावर छापा
sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी : शिलेगाव (ता. राहुरी) येथे कपारवाडी शिवारातील दोन दूध संकलन केंद्रांवर नगरच्या अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. भेसळयुक्त दूध व दूध भेसळीच्या रसायनांचा ३६ हजार ६३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

भेसळयुक्त दुधाचे व रसायनांचे नमुने विश्लेषणासाठी घेऊन, ६०० लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट करण्यात आले. दूध केंद्र सील करून, दूध केंद्राचा परवाना त्वरित निलंबित करण्यात आल्याची माहिती अन्न, औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांनी दिली.

आज (बुधवारी) सकाळी साडेसात वाजता शिलेगाव येथे नगरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुटे, शरद पवार, नमुना सहाय्यक प्रसाद कसबेकर यांच्या पथकाने छापा टाकून, कारवाईचा बडगा उगारला. 

हेही वाचा - षटकाराच्या बादशहाची अपघाताने घेतली विकेट

व्हेटर्नरी डॉक्टर दिलीप रघुनाथ म्हसे यांच्या गोरक्षनाथ दूध संकलन केंद्राच्या ठिकाणी गोठ्यामध्ये दूध भेसळीसाठी साठवलेली १०० किलो व्हे पावडर, ४० लिटर व्हे पावडर द्रावण व ३०० लिटर गाईचे दूध असा २४,९३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  रमेश पाटीलबा म्हसे यांच्या म्हसे पाटील दूध संकलन केंद्रावर १५ किलो व्हे पावडर, ३०० लिटर गाईचे दूध असा ११,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

दोन्ही दूध संकलन केंद्रांचे भेसळयुक्त ६०० लिटर दूध जागेवर ओतून नष्ट करण्यात आले. दोन्ही दूध केंद्राचे परवाने त्वरित निलंबित करून, पथकाने दूध केंद्र सील केले. भेसळयुक्त दूध व रसायनांचे नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेण्यात आले.

'सकाळ' शी बोलतांना सहाय्यक आयुक्त शिंदे म्हणाले, "दोन्ही व्यवसायिक दररोज ७५० ते ८०० लिटर दूध शेतकऱ्यांकडून संकलित करायचे. त्यामध्ये कृत्रिम तयार केलेले २५० ते ३०० लिटर दूध मिश्रण करून, दररोज एक हजार लिटर भेसळयुक्त दूध पुढे विक्री करायचे. अशी गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या नगर कार्यालयाला मिळाली. त्यानुसार, दोन्ही दूध संकलन केंद्रांवर छापा टाकून कारवाई केली."