
देशाच्या सहकारी क्षेत्राला आकार देण्याचे काम विखे घराण्याने केले. विखे पाटील शब्द पाळणारे, शब्दाला जागणारे मित्र आहेत.
श्रीरामपूर (अहमदनगर) : देशाच्या सहकारी क्षेत्राला आकार देण्याचे काम विखे घराण्याने केले. विखे पाटील शब्द पाळणारे, शब्दाला जागणारे मित्र आहेत. ऊसतोडणीपासून साखर उत्पादनापर्यंत मोठी कसरत करावी लागते. विखे पाटील कसे तीन- तीन कारखाने चालवितात? त्यांनी ही कला आम्हाला शिकवावी, असे वक्तव्य ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
श्रीरामपूर पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी मंत्री सत्तार बोलत होते. आमदार राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्षस्थानी होते.
हेही वाचा : सत्तार यांनी सर्व विघ्न टाळुन हजेरी लावली; भाजपच्या विखे पाटलांकडून कौतुक
मंत्री सत्तार म्हणाले, पंचायत समिती, ग्रामपंचायतीला पुर्वी निधी मिळत नसल्याने वाईट परिस्थिती होती. परंतु, १५ व्या वित्त आयोगातून पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्यांना भरीव निधी मिळून कामे करण्याची संधी मिळणार आहे. घरकुल योजनेत स्वतःची जागा नसल्यास त्यासाठीच्या निधीत वाढ केली जाणार आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. मंत्री सत्तार म्हणाले, “महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अनेक संकटे आली. त्यामुळे सरकारी योजना राबविण्यात उशीर होत आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनातून जनतेला वाचविण्याचे कार्य संयमाने पार पाडले." आकारी पडीक जमीनवाटपात गैरव्यवहार केलेल्या अधिकाऱ्यांची फेरचौकशी करणार आहोत.
देशाच्या सहकारी क्षेत्राला आकार देण्याचे काम विखे घराण्याने केले. विखे पाटील शब्द पाळणारे, शब्दाला जागणारे मित्र आहेत. ऊसतोडणीपासून साखर उत्पादनापर्यंत मोठी कसरत करावी लागते. विखे पाटील कसे तीन- तीन कारखाने चालवितात? त्यांनी ही कला आम्हाला शिकवावी, असे सत्तार यांनी म्हणताच हास्यांचे फवारे उडाले.
संपादन : अशोक मुरुमकर