esakal | मंत्री देशमुख यांचे तमाशा कलावंतांना २३ सप्टेंबरला मुंबईत येऊन म्हणने मांडण्याचे आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Deshmukh appeals to tamasha artists to come to Mumbai on 23 September

महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशातील कलाकारांच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार संवेदनशील आहे.

मंत्री देशमुख यांचे तमाशा कलावंतांना २३ सप्टेंबरला मुंबईत येऊन म्हणने मांडण्याचे आवाहन

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशातील कलाकारांच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार संवेदनशील आहे. रघुवीर खेडकर आणि इतर काही मंडळींच्या शिष्टमंडळाने 23 सप्टेंबरला मुंबईत येऊन आपल्या मागण्या व म्हणने मांडावे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी केले. 

महाराष्ट्र राज्य तमाशा फडमालक कलावंत विकास महामंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी सरकारने तमाशा कलाकारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील निवडक तमाशा फडमालकांसह तमाशापंढरी नारायणगाव येथे एक दिवसीय उपोषण केले. त्यावेळी खेडकर यांच्याशी मंत्री देशमुख यांनी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहा महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू असल्याने मागील वर्षीचा तमाशाचा हंगाम कार्यक्रमाविना गेला. त्यामुळे तमाशा कलाकारांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. यासंदर्भात शासनाने पावले उचलावीत म्हणून हे उपोषण करण्यात आले.

यावेळी जुन्नरचे आमदार अतुल बेनके, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर, आमदार बेनके यांनी खेडकर यांना स्वतःच्या हाताने फळांचा रस देऊन या लाक्षणिक उपोषणाची सांगता केली. आमदार बेनके यांच्या उपस्थितीत तमाशा कलाकारांचे प्रश्न आणि मागण्या महाराष्ट्र तमाशा अभ्यास परिषदेचे अध्यक्ष डॉ. संतोष खेडलेकर यांनी मांडल्या. तसेच अनेक तमाशा कलाकारांनी आपल्या व्यथा भाषणातून मांडल्या. 

यावेळी महाकला मंडळाचे लक्ष्मीकांत खाबिया, ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना वर्षा संगमनेरकर, मुसाभाई इनामदार, मालती इनामदार, कैलास नारायणगावकर, राजू बागुल, विनायक महाडिक, संजय महाडिक, सुधाकर पोटे, सीमा पोटे, अमर पुणेकर, संभाजी व शांताबाई संक्रापुरकर, शिवकन्या बडे नगरकर, महादेव देशमुख, जयसिंगराव पवार, महेश पिंप्रीकर, मंदा पाटील पिंपळेकर, वामनराव मेंढापुरकर आदी तमाशा फडमालक उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर