मंत्री थोरात म्हणतात, तिरुपती मंदिर खुले झाले तर शिर्डी, सिद्धीविनायक मंदिराबाबत विचार

balasaheb thorat said
balasaheb thorat said
Updated on

संगमनेर : लॉकडाउन असल्याने राज्य सरकारने प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वच प्रार्थनास्थळे बंदी केली आहेत. त्यामुळे देव कुलूपबंद आहेत. अनेक धार्मिक संघटना प्रार्थना स्थळे उघडी करण्याची मागणी करीत आहेत. परंतु राज्य सरकारने आतापर्यंत कोणताच निर्णय घेतलेला नाही. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखणे हेच प्रथम कर्तव्य असल्याचे सरकार मानते.

येत्या 11 तारखेपासून दक्षिणेतील तिरुपती बालाजी मंदिर दर्शनासाठी सुरू होणार असले तरी, राज्यातील मंदिरे दर्शनासाठी खुली  करण्याचा निर्णय वरीष्ठ पातळीवर घेतला जाईल. कोरोनाच्या संकटापासून जनतेला वाचवण्याला आमची प्राथमिकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर साखर कारखाना कार्यस्थळावर खासगी वाहिनीच्या प्रतिनिधीसोबत ते बोलत होते.

थोरात म्हणाले, प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर 11 जुनपासून दर्शनासाठी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कोरोना संकटाला राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य देत अाहे. परंतु महाराष्ट्रातील शिर्डीतील साईबाबा मंदिर तसेच सिद्धिवनायकसारखी मंदिरे खुली करण्याच्या दृष्टीने विचार करावा लागेल. परंतु आजची एकंदर परिस्थिती पाहाता या बाबत विचार करून वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल, असे थोरात म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Worked by Day, Trained at Dawn: Sangamner Youth Achieves His Police Dream
DNA Test to Solve Rahuri Burial Mystery After Missing Man Reappears Alive
Temple Visit Turns Political: Srikant Shinde Slams Opposition Over Hindutva Stand
Satyajeet Tambe
Marathi News Esakal
www.esakal.com