
संगमनेर: संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात गहाळ झालेले मोबाईल फोन शोधून काढण्यात संगमनेर पोलिसांना यश आले. तांत्रिक विश्लेषण आणि अत्याधुनिक पोर्टलच्या माध्यमातून तपास केल्यानंतर तब्बल २० महागडे मोबाईल शोधण्यात आले. हे मोबाईल मूळ मालकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले असून, त्यांची एकूण किंमत ३ लाख ९६ हजार रुपये एवढी आहे.