

MLA Amol Khatal
Sakal
संगमनेर : नाशिक-पुणे रेल्वेमार्ग संगमनेर शहरातून व्हावा, ही माझी सुरवातीपासूनची ठाम भूमिका आहे. यासाठी मी केलेला पाठपुरावा कधीच थांबलेला नाही. संगमनेरच्या सर्वांगीण विकासाचा, भविष्यातील वाहतूक-सुविधांचा आणि उद्याच्या पिढ्यांच्या संधींचा हा अत्यंत निर्णायक विषय आहे. त्यामुळे या मुद्द्याकडे हलक्यात पाहणे म्हणजे संगमनेरच्या भवितव्याशी तडजोड करण्यासारखे आहे, असे स्पष्ट मत आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केले.