नागपूर ते मुंबई बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण

MLA Ashutosh Kale has informed that the survey work of Nagpur to Mumbai bullet train has been completed.jpg
MLA Ashutosh Kale has informed that the survey work of Nagpur to Mumbai bullet train has been completed.jpg

कोपरगाव (अहमदनगर) : तालुक्‍यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गालगतच मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन नियोजित लोहमार्ग टाकण्याची पूर्वतयारी सुरू झालेली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना वाढीव मोबादला मिळवून देऊ, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

महापालिका क्षयरोग मुक्‍त शहर करणार : डॉ. बोरगे
 
आमदार काळे यांनी या कामाबाबत शेतकरी व अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. त्यामध्ये शेतकऱ्यांची कैफीयत ऐकून घेतली. आमदार काळे म्हणाले, समृध्दी महामार्गासाठी जमिनी संपादित करताना त्यावेळीही शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आपण सुरवातीपासून घेतली. त्यांना वाढीव मोबदला मिळवून दिला आहे. हे काम सुरू असताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर केल्या. त्यासाठी गरज पडेल त्यावेळी ठेकेदारांना तंबी देखील दिली. ही नियोजित बुलेट ट्रेन समृद्धी महामार्गाच्या दक्षिण बाजूने जाणार आहे. लोहमार्गासाठी महामार्गालगत 17.5 मीटर रूंदीची जमीन अधिग्रहीत केली जाणार आहे. यामध्ये जवळपास 1200 शेतकऱ्यांच्या जमिनी जातील. त्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही ते म्हणाले.

आंदोलन करताच राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू
 
या नियोजित लोहमार्गाचे सर्वेक्षण टुला या कंपनीचे अधिकारी संजय जाधव, आनंदराव चव्हाण, बाळासाहेब रोहमारे, पदमकांत कुदळे, मधुकर टेके, गोरक्षनाथ जामदार, चारुदत्त सीनगर, दिलीपराव बोरनारे, दिलीप शिंदे, देवेन रोहमारे, सुधाकर होन, सुनील होन, शंकर गुरसळ, बंकटराव जगताप, कृष्णा शिलेदार, राजेंद्र निकम, भास्कर होन आदींसह शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com