
कोपरगाव: शहरातील विविध शासकीय कार्यालयांत सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक केली जात असून, काही शासकीय अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. हा प्रकार गंभीर असून, सर्वसामान्य नागरिकांची कोणत्याही शासकीय कार्यालयात होणारी आर्थिक पिळवणूक सहन केली जाणार नाही, असा ईशारा आमदार आशुतोष काळे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला आहे.