

Ashutosh Kale Takes Firm Stand; Meets Ajit Pawar Seeking Action on Illegal Operations
Sakal
कोपरगाव मतदारसंघातील अवैध धंद्यांच्या बीमोडासाठी रस्त्यावर उतरू : आमदार आशुतोष काळे यांचा इशारा, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट
कोपरगाव, ता. ३ ः कोपरगाव शहरासह संपूर्ण विधानसभा मतदारसंघात अवैध धंदे सुरू आहेत. त्यावर पोलिस यंत्रणेकडून आळा बसेल, यावर जनतेचा आणि माझाही विश्वास राहिलेला नाही. गुन्हेगारी वाढली असून, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करणारे निवेदन आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. त्यांनी त्यावर कारवाई करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे वेळ पडल्यास या प्रश्नी आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा आमदार आशुतोष काळे यांनी दिला.
कोपरगाव शहरासह संपूर्ण विधानसभा मतदारसंघात वाढलेले अवैध धंदे आणि गुन्हेगारीचा बीमोड करण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, विविध अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. गुन्हेगारी वाढली आहे. पोलिस प्रशासन मात्र त्याकडे डोळेझाक करीत आहे. सामान्य नागरिकांत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जुगार व मटका, तसेच अवैध दारू, तंबाखू, गुटखा विक्री उघडपणे सुरू आहे. ऑनलाइन बेटिंगचे जाळे पसरले. तरुण पिढी त्यात अडकत आहेत. भरदिवसा गोदावरी नदीपात्रातून वाळूउपसा बिनदिक्कतपणे सुरू आहे. अवैध धंद्यांमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन होत गुन्हेगारीकडे वळत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.