esakal | घोंगडी बैठकांमधून कार्यकर्त्यांची मोठी यंत्रणा उभी करणार : पडळकर
sakal

बोलून बातमी शोधा

Gopichand Padalkar

घोंगडी बैठकांमधून कार्यकर्त्यांची मोठी यंत्रणा उभी करणार : पडळकर

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पारनेर (जि. नगर) : लवकरच पारनेर तालुक्यासह जिल्हाभर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांना समजावून सांगण्यासाठी व पक्षसंघटना वाढविण्यासाठी दौरा करणार आहे. या दौऱ्यावेळी गावोगावी जाऊन, जास्तीत जास्त घोंगडी बैठका घेऊन कार्यकर्त्यांची मोठी सक्षम यंत्रणा उभी करण्यात येणार असल्याचे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुपे येथे कार्यकर्त्यांसमवेत बोलताना सांगितले.


आमदार पडळकर परळी दौऱ्यावर जात असताना वाटेत सुपे येथे विश्रामगृहावर काही काळ थांबले असताना कार्यकर्त्यांशी बोलत होते. या वेळी भारतीय जनता पक्ष व सुपे शहराच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. सुप्याचे उपसरपंच व युवा मोर्चाचे सरचिटणीस सागर मैड यांनी धनगर समाजाच्या अडीअडचणींविषयी निवेदन दिले. धनगर समाजासाठी असणाऱ्या सरकारच्या विविध योजनांच्या माहिती पुस्तिकेचे धनगर समाजबांधवांना वाटप करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. सुपे परिसरातील काही कामांसाठी निधी मिळावा, असा आग्रह त्यांनी केला.


पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सुनील थोरात, युवा मोर्चाचे सागर मैड, तुषार पवार, मधुकर पठारे, देविदास सोमवंशी, सागर कुंडलिक प्रफुल्ल पवार, ऋषी पवार, किशोर जाधव, सचिन कारंडे, जयेश साबळे, प्रमोद चितळकर, शुभम चितळकर, सचिन उमाप, सद्दाम शेख, संदीप पवार, प्रकाश वेताळ, मनोज चितळकर, मुरलीधर पवार, राजे रणसिंग, अमोल मैड उपस्थित होते.

हेही वाचा: 'मी संगमनेरकर' आंदोलनाला यश! अखेर स्थानिकांना टोलमधून दिलासा

हेही वाचा: सभेला यायचं अन् उपाशी जायचं; सदस्यांची झेडपीच्या सभेत नाराजी

loading image
go to top