
MLA Hemant Ogle demands wet drought declaration and ₹50,000 per hectare relief for rain-affected farmers.”
Sakal
श्रीरामपूर: सततच्या पावसामुळे श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी तत्काळ आर्थिक साहाय्याशिवाय अडचणीत आला आहे. हातातोंडाशी आलेले पीक नजरेसमोर पाण्यात सडत आहे. घरांची पडझड झाली आहे. शेतकरी मानसिक तणावाखाली आले आहेत. या गंभीर परिस्थितीत आमदार हेमंत ओगले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.