
MLA Monika Rajale appeals to flood victims to submit damage details to administration for timely relief.
Sakal
अमरापूर: महापूरामुळे झालेल्या मालमत्तेचे व शेतीच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ अहवाल सादर करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. या नैसर्गिक संकटाचा सामना सरकार, प्रशासन व नागरिक यांच्या समन्वयाने अधिक व्यवस्थितपणे करता येईल. नागरिकांनी खचून न जाता झालेल्या नुकसानीची माहिती प्रशासनाला द्यावी, अशा शब्दात आमदार मोनिका राजळे यांनी पूरग्रस्तांना धीर दिला.