गाव बिनविरोध झाले! आमदार लंके यांनी दिला 31 लाख निधी

MLA Nilesh Lanke has assured that Rs 31 lakh has been sanctioned for Takli Dhokeshwar village
MLA Nilesh Lanke has assured that Rs 31 lakh has been sanctioned for Takli Dhokeshwar village

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्याने मतदारसंघाला निधीची कमतरता जाणून देणार नाही. बिनविरोध ही संकल्पना जनसामान्यांना भावली असल्याने मोठ्या प्रमाणावर सदस्य बिनविरोध झाले आहेत. सर्वप्रथम जाधववाडी गावाने या प्रक्रियेत सहभाग घेतला त्यामुळे या गावाला 31 लाख रूपये निधी मंजूर केला असल्याचे आश्वासन आमदार निलेश लंके यांनी दिले.

जाधववाडी (ता.पारनेर) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत नळपाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण पार पडले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती राहुल झावरे होते. यावेळी सरपंच विठ्ठल जाधव, एस.आर.राऊत, रामदास राऊत, राजेंद्र राऊत, भाऊसाहेब राऊत, प्रशांत राऊत उपस्थित होते. 

पाठकबाई म्हणाल्या, रोहितदादाच मतदारसंघाचे राणादा, महाराष्ट्र सुंदर करण्यासाठी पुढाकार घ्या
 
लंके म्हणाले, जाधववाडी हे गाव माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या विचारांवर चालणारे गाव असल्याने येथील ग्रामपंचायत बिनविरोध होण्यासाठी सर्वांनी सहमती दर्शविली.

राहुल झावरे म्हणाले, बिनविरोध निवडणुकीची सर्वाधिक भिती ही प्रस्थापित पुढा-यांना वाटली. आपले राजकारण यामुळे संपणार तर नाही ना, अशी शक्यता त्यांना वाटली होती, यामुळे त्यांनी या प्रक्रियेला विरोध केला. मात्र, गावात एकोपा टिकवून राहण्यासाठी व विकासकामे होण्यासाठी बिनविरोधचा पर्याय हा योग्यच होता असल्याचे समोर आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान राऊत यांनी केले आभार बाबाजी राऊत यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com