पारनेर नगरपंचायतीच्या सत्तेसाठी लंके विरुद्ध औटी संघर्ष

शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने आम्ही शहराच्या विकासासाठी मोठा निधी आणू शकतो.
NILESH LANKE v VIJAY OUTI
NILESH LANKE v VIJAY OUTISAKAL

पारनेर : पारनेर नगरपंचायतीची (parner nagarpanchayat)सूत्रे कोणाच्या हाती जाणार, हे आज तरी निश्चित सांगता येणार नाही. मात्र, निकालावरून त्रिशंकू अवस्था झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचा(bjp) एक व शहरविकास आघाडीचे दोन, हे तीन नगरसेवक ज्या गटाला जाऊन मिळतील, त्या गटाची सत्ता नगरपंचायतीमध्ये स्थापन होणार, हे निश्चित. आता सत्तेची दोरी शहरविकास आघाडीच्या हाती गेली आहे.नगरपंचायतीची निवडणूक आमदार नीलेश लंके(mla nilesh lanke) व माजी आमदार विजय औटी (ex mla vijay outi) यांनी प्रतिष्ठेची केली होती. यात आमदार लंके यांनी विकासाच्या मुद्द्यावर, तसेच शहराचा पिण्याचा पाणी प्रश्न कायमचा सोडविणे व शहराच्या विकासासाठी मोठा निधी देण्याच्या मुद्द्यावर प्रचार केला होता. मात्र, मतदारांना हे मुद्देही भावले नाहीत, असेच म्हणावे लागले. कारण, त्यांनी राष्ट्रवादीलासुद्धा पूर्ण बहुमतापर्यंत पोचू दिले नाही. (Parner Nagar Panchayat Election Updates: Nilesh Lanke vs Vijay Outi)

NILESH LANKE v VIJAY OUTI
अहमदनगरमध्ये महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू

हीच अवस्था माजी आमदार औटी यांची झाली आहे. त्यांनी पारनेर शहराचे नेतृत्व शहरातील नेत्याने करावे, बाहेरच्या लोकांनी शहराचे नेतृत्व करू नये, अशी प्रचाराची सुरवात करीत, शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने आम्ही शहराच्या विकासासाठी मोठा निधी आणू शकतो. पारनेरचे शहरीकरण करण्यासाठी शिवसेनेला मतदान करा, असा प्रचाराचा मुद्दा केला होता. त्यांनाही फारसे यश आले नाही.

शहरविकास आघाडीने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत भारतीय जनता पक्षाबरोबर(bjp ahmednagar) युती करीत निवडणूक लढविली. मात्र, त्यांनाही फारसे यश संपादन करता आले नाही. भारतीय जनता पक्षाने दोन जागा लढविल्या. त्यांपैकी एक जागा जिंकता आली. विकास आघाडीलाही दोनच जागा मिळाल्या. बलाबल पाहता, शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन करावयाची असेल तर त्यांना शहरविकास आघाडी व भारतीय जनता पक्षाची मदत घ्यावी लागेल. त्यामुळे सत्तेची दोरी शहरविकास आघाडीच्या हातात गेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com