बदल्यांच्या गैरव्यवहारात जिल्ह्यातील नेता; विखे पाटलांचा गौप्यस्फोट

बदल्यांच्या गैरव्यवहारात काही मंत्र्यांचीही नावे समोर येतील.
 Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSakal


शिर्डी (जि. अहमदनगर) : प्राप्तिकर विभागाने समोर आणलेल्या एक हजार ५० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात नेमके कोणाचे हात सोन्याने पिवळे झाले, हे लवकरच पुढे येईल. बदल्यांच्या गैरव्यवहारात काही मंत्र्यांचीही नावे समोर येतील. हे रॅकेट उघड झाल्यावर जिल्ह्यातील काहींची नावे पुढे आल्यास आश्चर्य वाटू देऊ नका, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या ७२व्‍या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ भाजप नेते आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील आणि जिल्‍हा बँकेचे संचालक अण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांच्‍या उपस्थितीत झाला. त्यानंतर विखे पाटील पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून भ्रष्‍टाचाराची मालिकाच समोर आली. राज्‍याच्‍या इतिहासात गृहमंत्री फरार झाल्‍याची घटना प्रथमच घडली. कालचा ‘बंद’ गैरव्यवहारावरून लक्ष विचलित करण्यासाठीच होता. केंद्राने आणलेले कृषी कायदे संसदेत मंजूर होत असताना महाविकास आघाडीचे मार्गदर्शक त्‍यावेळी सभागृहात काही बोलले नाहीत. शिवसेना खासदारही गप्प बसले. मुख्‍यमंत्री हतबल झाले आहेत.’’

प्रवरा बँकेचे अध्यक्ष अशोकराव म्‍हस्‍के, कारखान्‍याचे संचालक डॉ. दिनकर गायकवाड, साहेबराव म्‍हस्‍के, संतोष ब्राह्मणे, पोपटराव वाणी यांच्‍या हस्‍ते सपत्‍नीक बॉयलरची विधिवत पूजा करण्‍यात आली. याप्रसंगी कारखान्‍याचे उपाध्यक्ष विश्‍वास कडू, ट्रक्‍स वाहतूक सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार राठी, पंचायत समितीच्‍या सभापती नंदा तांबे, प्रवरा फळे-भाजीपाला संस्‍थेच्‍या अध्यक्षा गीता थेटे, जिल्‍हा परिषद सदस्‍य दिनेश बर्डे, रोहिणी निघुते, प्रभारी कार्यकारी संचालक सी. आर. गायके आदी यावेळी उपस्थित होते.

 Radhakrishna Vikhe Patil
डोळ्यांसमोर जन्मदात्रीचा अंत; चिमुरड्यांच्या आकांताने परिसर सुन्न

‘बंद’साठी आटापिटा, शेतकरी वाऱ्यावर

उत्तर प्रदेशातील घटनेच्या संदर्भात गृहराज्य मंत्र्यांच्या मुलाला अटक झाली. महाराष्ट्रात मात्र माजी गृहमंत्री आणि पोलिस महासंचालक दोघेही फरार आहेत. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान सहन न झाल्याने शेतकरी आत्महत्या करताहेत आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार मात्र उत्तर प्रदेशातील घटनेवरून ‘बंद’साठी आटापिटा करताना दिसले. आधी राज्यातील शेतकऱ्यांकडे पाहिले तर बरे होईल.
- राधाकृष्ण विखे पाटील, आमदार

 Radhakrishna Vikhe Patil
आधार कार्ड आता स्वतःलाच करता येईल अपडेट, ही आहे सोपी प्रोसेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com