Rajesh Tope:पाय ओढणे हा पक्षाला जुना रोग, राजेश टोपेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात बोलून दाखविली खंत

''एकमेकांचे पाय ओढणे हा आपल्या पक्षाला जुना रोग आहे,’ अशी खंत माजी मंत्री राजेश टोपे यांनी शिबिरात बोलून दाखवली.
Rajesh Tope:पाय ओढणे हा पक्षाला जुना रोग, राजेश टोपेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात बोलून दाखविली खंत

NCP Shirdi : पक्ष दुभंगला, याचा आता विचार न करता प्रत्येकाला सहकार्य करून पुढे जाण्याची गरज आहे. कारण, ''एकमेकांचे पाय ओढणे हा आपल्या पक्षाला जुना रोग आहे,’ अशी खंत माजी मंत्री राजेश टोपे यांनी शिबिरात बोलून दाखवली. ज्येष्ठ नेते शरद पवार हाच आपला आश्वासक चेहरा असून, प्रत्येकाने एकमेकाला सहकार्य करून पक्षासाठी काम करण्याचे आवाहन टोपे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथे सुरू असलेल्या शिबिरात गुरुवारी (ता.४) टोपे बोलत होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख, खासदार सुप्रिया सुळे, फौजिया खान, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार अमोल कोल्हे, आमदार एकनाथ खडसे, रोहिणी खडसे आदी पक्षाचे नेते शिबिरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

टोपे पुढे म्हणाले की, पक्षाला आज निष्ठावान कार्यकर्त्यांची गरज असून, पुरोगामी विचारधारेसाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. शरद पवार ही व्यक्ती नाही, तर विचारधारा असून, ते आपल्या पक्षाचा आश्वासक चेहरा आहेत. मागच्या काळात भाजपने राज्यातील दोन पक्ष फोडले आणि आपल्या पक्षातील नेते त्याला बळी पडले, ही दुर्दैवाची बाब आहे. (Latest Marathi News)

मात्र, आता राज्यातील तरुण वर्गाला शरद पवारांवर विश्वास आहे. त्यामुळे आपण तरुणांना जागृत केले पाहिजे, तसेच सध्याचे राजकारण खुनशी असल्याचे सांगत युती सरकार विरोधी पक्षातील आमदारांना निधी देण्यात पक्षपातीपणा करत असल्याची टीकाही टोपे यांनी केली.

Rajesh Tope:पाय ओढणे हा पक्षाला जुना रोग, राजेश टोपेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात बोलून दाखविली खंत
Pune Crime News : पुण्यातील गुंड शरद मोहोळवर गोळीबार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com