esakal | नितीश कुमार बोध घेतात की घात पचवतात, हे पहावं लागेल
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Rohit Pawar criticizes BJP over Bihar elections

संपूर्ण भारताचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणूकीचे अधिकृत निकाल बुधवारी (ता. ११) पहाटे जाहीर झाले. यामध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सर्वाधिक जागा आरजेडीला मिळाल्या आहेत.

नितीश कुमार बोध घेतात की घात पचवतात, हे पहावं लागेल

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : संपूर्ण भारताचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणूकीचे अधिकृत निकाल बुधवारी (ता. ११) पहाटे जाहीर झाले. यामध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सर्वाधिक जागा आरजेडीला मिळाल्या आहेत. त्यामुळे खरे बाजीगर तेजस्वी यादव ठरले आहेत.

नितीशकुमार यांचा पक्ष तीन नंबरला पडला असला तरी ते मुख्यमंत्री होतील, अशी शक्यता आहे. यामध्ये बाजीगर ठरलेले तेजस्वी वादव यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ‘खरे हिरो’ म्हणत त्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या तर भाजपवर त्यांनी टीका केली आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरु झाली तेव्हापासूनच सर्वत्र काट्यांवरची टक्कर सुरू होती. रात्री उशीरापर्यंत कोणालाही काही अंदाज येत नव्हता. मात्र मंगळवारी मध्यरात्रीनंतर एनडीएला बहुत मिळेले असे चित्र स्पष्ट दिसत होते. शेवटपर्यंत येथील निकालामध्ये उत्सुकता होती. मात्र सकाळी महागठबंधन मागे पडले ते पुढे आलेच नाही. एनडीए आणि महागठबंधन यांच्यात काहीवेळा दोन- तीन जागांचा फरक होता. त्यामुळे कोणत्याही गटाकडून जल्लोष केला जात नव्हता. यामध्ये सुरुवातीपासूनच एनडीएकडून नितिशकुमार यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर होते. तर महागठबंधनकडून तेजस्वी यादव यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी होते. मात्र, या लढतीत एनडीएला १२५ जागा मिळाल्या तर महागठबंधनला ११० जागा मिळाल्या. त्यामुळे तेजस्वी यादव यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भंगले. असे असले तरी आरजेडीला ७५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे खरे हिरो यादवच झाले असल्याचे मानले जात आहे.

भाजपला ७४ जागा मिळाल्या आहेत तर जेडीयूला फक्त ४३ जागा मिळाल्या. तीन नंबरच्या जागा मिळाल्या असतानाही ते मुख्यमंत्री होणार का याकडे लक्ष लागले आहे. भाजपने नितिशकुमारच मुख्यमंत्री होतील असं जाहीर केले असले तरी नितिशकुमार यांना काँग्रेसच्या एका नेत्याने भाजपपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. नितिशकुमार यांच्या जेडीयूच्या जागा कमी येण्यास भाजपच कारणीभूत असल्याचे काही विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. या निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या सर्वाधिक जागा आल्याने शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे शरद पवार यांनीही त्यांचे कौतुक केले आहे. 

रोहित पवार यांनीही ट्विट करत म्हटलं आहे की, ‘बिहारमध्ये काट्याची टक्कर सुरू असली तरी बलाढ्य शक्तीशी एकटे लढत असलेले तेजस्वी यादव हेच खरे हिरो आहेत. त्यांना बिहारी युवांनीही खंबीर साथ दिलीय. ही लढाई अजून संपली नाही, पण भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळालं. 

यातून बोध घेऊन नितिशकुमार हे त्यांच्याशी झालेला घात पचवतात की काही वेगळा निर्णय घेतात, हे पहावं लागेल. तसंच कोणाच्याही दबावाला बळी न पडता मतमोजणीत गडबड होणार नाही याची दक्षता घेऊन आपण स्वायत्त असल्याचं निवडणूक आयोग दाखवेल, असा विश्वास आहे आणि प्रशासनानेही आयोगाला साथ द्यावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.