आमदार रोहित पवार यांची दादा पाटील महाविद्यालय समितीवर निवड

MLA Rohit Pawar elected on Dada Patil College Committee
MLA Rohit Pawar elected on Dada Patil College Committee

कर्जत : येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय विकास समितीच्या सदस्यपदी आमदार रोहित पवार यांची नियुक्ती झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी दिली. 

संस्थेच्या वतीने तसे नियुक्तीचे पत्र महाविद्यालयास प्राप्त झाले आहे. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आमदार रोहित पवार यांच्या नियुक्तीमुळे महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले.

दादा पाटील महाविद्यालयाची ख्याती सर्वदूर आहे. येथील शिक्षण रयतच नव्हे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रसिद्ध आहे. आमदार रोहित पवार हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. त्यांच्यामुळे महाविद्यालय नक्कीच वरचे स्थान गाठेल.

संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अंबादास पिसाळ, महाविद्यालय विकास समिती सदस्य राजेंद्र निंबाळकर, बाप्पासाहेब धांडे व प्राचार्य डॉ. बाळ कांबळे उपस्थित होते. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com