
पवार म्हणाल्या, उपजिल्हा रुग्णालयात ईसीजी आणि एक्स रे सुविधा उपलब्ध झाली असून ग्रामीण सह शहरी भागातील रुग्णांसाठी हा फिरता दवाखाना मोठी उपलब्धता आहे. चांगल्या आरोग्यासाठी व्याधींकडे दुर्लक्ष करू नका.
कर्जत (अहमदनगर) : मतदारसंघ कॅन्सर मुक्त करण्याचा निर्धार आमदार रोहित पवार यांनी केला असून आरोग्य सेवेपासून एकही गरजू वंचित राहणार नाही. आता या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून घरपोहोच सुविधा उपलब्ध झाली असून तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्या विश्वस्त तथा कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या संचालिका सुनंदा पवार यांनी केले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, एचडीएफसी बँकेच्या सहकार्यातून व आमदार.रोहित पवार आणि कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था यांचे माध्यमातून मोबाइल क्लिनिक व्हॅन (फिरता दवाखाना) चे हस्तांतरण व लोकार्पण श्रीमती पवार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. वैद्यकीय अधिक्षिका डॉ. सुचेता यादव, काका तापकीर, बापूसाहेब नेटके, सतीश पाटील, सुनील शेलार, मनीषा सोंनमाळी, डॉ.प्रकाश भंडारी, डॉ.शबनम शेख, राजेश्वरी तनपुरे, मंदार काळदाते, भास्कर भैलूमे, सचिन कुलथे तसेच गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप पुंड, कृषी अधिकारी दीपक सुपेकर, एच डी एफ सी चे विभाग प्रमुख हेमंत चव्हाण, शाखा व्यवस्थापक राजेंद्र बिलावर (श्रीगोंदा) आदी उपस्थित होते.
सिनेअभिनेत्रीच्या आत्महत्येस कारणीभूत मंत्र्याला पाठीशी घालू नका
पुढे पवार म्हणाल्या, उपजिल्हा रुग्णालयात ईसीजी आणि एक्स रे सुविधा उपलब्ध झाली असून ग्रामीण सह शहरी भागातील रुग्णांसाठी हा फिरता दवाखाना मोठी उपलब्धता आहे. चांगल्या आरोग्यासाठी व्याधींकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच उपचार केल्यास अनर्थ टळतो. दळण वळण सुविधा अभावी मुलींचे शिक्षण थांबते पर्यायाने अल्पवयीन लग्नाचे प्रमाण वाढते यामुळेच आगामी काही दिवसात येथील एस टी डेपोचे भूमिपूजन होणार आहे. शहरासह तालुक्याचे आरोग्य सुधारावे यासाठी अनेक जण सरसावले आहेत. मात्र, नागरिकांत अजून आपले पणाची भावना नाही. या लोक चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे. प्रास्ताविक डॉ. नितीन पिसाळ यांनी केले तर डॉ. सुचेता यादव यांनी आभार मानले.
कुठलीही योजना अथवा विकासनिधी सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करावा लागतो, प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी रात्रदिन आमदार रोहित पवार यांची धावपळ, धडपड सुरू असते. त्याला यश येत असून निधी आणण्यात ते राज्यात अग्रेसर आहेत. म्हणूनच जेथे अडचण, तिथे रोहित दादा हे समीकरण झाले आहे, असे सुनंदा पवार यांनी स्पष्ट केले.