esakal | भाजपशासित राज्यात सरकार विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना गाडीखाली चिरडून मारलं जातंय
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Rohit Pawar said that the Opposition was trying to discredit Maharashtra

महाराष्ट्रात अभिनेता सुशांतसिह मृत्यू प्रकरण व अभिनेत्री कंगना राणवत प्रकरण यामध्ये दररोज नवनवीन खुलासे पुढे येत आहेत. याकडे इतर राज्याचेही लक्ष लागले आहे.

भाजपशासित राज्यात सरकार विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना गाडीखाली चिरडून मारलं जातंय

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : महाराष्ट्रात अभिनेता सुशांतसिह मृत्यू प्रकरण व अभिनेत्री कंगना राणवत प्रकरण यामध्ये दररोज नवनवीन खुलासे पुढे येत आहेत. याकडे इतर राज्याचेही लक्ष लागले आहे. त्यातच बिहारमध्ये होऊ घातलेल्या निवडणूकीत याचा उपयोग केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रकार असल्याचा आरोप सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारकडून केला जात आहे. याबाबत कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे.

महाराष्ट्रात शिवसेना व भाजप यांनी एकत्रीत विधानसभा निवडणूक लढवली होती. तर काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक रिंगणात होते. पुढे भाजप आणि शिवसेनेची मुख्यमंत्रीपदावरुन युती तुटली. त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेनी एकत्र येत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने सरकार स्थापन केले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सुशांतसिह मृत्यप्रकरणातून सरकार विविध आरोप करण्यात आले. त्यानंतर कांगना राणातव यांनी केलेले वक्तव्य आणि त्यानंतर त्यांच्या बांधकामावर झालेली कारवाई चर्चेत आली. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लि करा

विरोधी पक्षाने सरकारवर केलेल्या आरोपावर आमदार रोहित पवार यांनी टविट केले आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, धर्मा पाटील या शेतकरी आजोबांना भाजप सरकारच्या काळात आपल्याला न्याय मिळत नसल्यामुळे मंत्रालयात आत्महत्या करावी लागली. हे एक उदाहरण झालं! आज सुद्धा बिहार, उत्तरप्रदेश या भाजपशासित राज्यात बलात्कार, खून या सारखे गुन्हे दिवसाढवळ्या घडत आहेत. सरकारविरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना गाडीखाली चिरडून मारलं जात आहे. अशा वेळी पीडितांना न्याय देण्याची साधी मागणी न करणारे भाजपचे नेते, कार्यकर्ते महाराष्ट्रात मात्र आक्रमक होतात. आपलं महाविकास आघाडी सरकार हे न्यायाच्या बाजूने उभा राहणार सरकार आहे. मात्र काही लोकांचा दुर्दैवाने पीडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्यांचा उपयोग करून हे सरकार डळमळीत करण्यात रस आहे. 

अभिनेते सुशांतसिंग राजपूत प्रकरण असो किंवा नागरिकाला झालेली मारहाण या प्रकरणात महाराष्ट्र सरकार व पोलिसांनी योग्य ती कारवाई सुरू केलेली आहे. महाविकास आघाडीचा एक घटक आणि महाराष्ट्राचा नागरिक म्हणून या पीडितांना लवकर न्याय मिळावा अशीच माझी मागणी असते. वाईट याच वाटत की, अशा गोष्टी घडल्यानंतर ठरावीक लोक लगेचच राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करायला लागतात. 

बिहार निवडणूक जवळ येताच महाष्ट्राची बदनामी करण्याचं कारस्थान सुरू झाले. आपले विरोधी पक्षनेते सुद्धा बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी करत आहेत. याआधी देखील राजकारणासाठी 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा', 'माझे अंगण, माझे रणांगण'  यासारखी राज्याचा अपमान करणारी आंदोलने भाजपने केलेली आहेत. त्यामुळे आता देखील बिहार निवडणुकीत आपल्या पक्षाला फायदा होण्यासाठीच महाराष्ट्राला दूषणे दिली जात आहेत. अस दिसतंय परंतु आपली जनता सुज्ञ आहे. 

विरोधकांचा 'पॅटर्न' सर्वांच्या लक्षात आलेला आहे. पीडितांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज्य सरकारवर गोळ्या चालवण्याच काम विरोधकांनी बंद करावं, महाराष्ट्रात त्यांचा हा 'पॅटर्न' कधीच यशस्वी होणार नाही, असंही त्यांनी ट्विट केलं आहे.