कर्जत: चांगले काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक करू, परंतु सर्वसामान्य जनतेला त्रास दिला, तर गय केली करणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिला. आपण जनसेवक आहोत, याचा विसर पडू देऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला. कर्जत येथील पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत ते बोलत होते.