डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम देवदूतासारखे : आमदार जगताप

आमदार संग्राम जगताप
आमदार संग्राम जगतापआमदार संग्राम जगताप

अहमदनगर : जिल्हा रुग्णालयाने कोविड काळामध्ये उत्कृष्ट अशी आरोग्यसेवा देऊन अनेक रुग्णांचे जीव वाचवण्याचे काम केले. कोविडचा काळ सुरू असल्यामुळे बाह्यरुग्ण विभाग बंद होता. आता हा विभाग सुरू करण्याच्या सूचना दिल्यानंतर काही बाह्य विभाग टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात येत आहे. माझ्या निधीतून डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी या रुग्णांना येण्या-जाण्यासाठी २५ सीटची वातानुकूलित आरोग्यसेवेची बस उपलब्ध करून दिल्याचा मला आनंद आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम देवदूता सारखे आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

आमदार जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून नेत्र शस्त्रक्रियेसाठी जिल्हाभरातील रुग्णांना जाण्या-येण्याची साठी २५ सीटची वातानुकूलित रुग्णवाहिका बससेवेचा प्रारंभ आमदार जगताप यांच्या हस्ते झाला. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, डॉ. मनोज घुगे, प्रा. माणिकराव विधाते, संतोष ढाकणे, साहेबाना जाहगिरदार, डॉ. मंगेश राऊत, डॉ. अजिता गरुड यांसह मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेले रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप
भाजपवाल्यांनी नाटके बंद करावेत; विखेंच्या टीकेला प्रत्युत्तर

यावेळी बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा म्हणाले, की आमदार जगताप यांनी बाह्यरुग्ण विभाग सुरू करावा, यासाठी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा सुरू केले आहे. विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर २६ रुग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली. त्या रुग्णांना वाहतुकीची सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेऊन मोलाचे सहकार्य केले व २५ सीटची वातानुकूलित रुग्णवाहिका बस उपलब्ध करून दिली. आज खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून रुग्णांना आरोग्य मंदिरापर्यंत पोहोचविण्याचे काम झाले आहे, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com