
नगर- पुणे दरम्यान प्रवाशांची संख्या मोठी आहे. खासगी वाहने, बसद्वारे नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी आदी हजारो प्रवासी रोज प्रवास करतात. परिणामी, रस्तेवाहतुकीवर ताण येतो.
अहमदनगर : शिर्डी- नगर- पुणे- मुंबई रेल्वे सेवेमुळे शिर्डी येथे येणाऱ्या साईभक्तांची मोठी सोय होत होती. रोज दीड ते दोन हजार प्रवासी या रेल्वेने प्रवास करीत होते. ही सेवा कोरोना संकटामुळे बंद आहे. ती पुन्हा सुरू केल्यास प्रवाशांची चांगली सोय होईल, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी रेल्वे स्थानक प्रबंधक नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
निवेदनात म्हटले आहे, की नगर- पुणे दरम्यान प्रवाशांची संख्या मोठी आहे. खासगी वाहने, बसद्वारे नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी आदी हजारो प्रवासी रोज प्रवास करतात. परिणामी, रस्तेवाहतुकीवर ताण येतो. रहदारी खोळंबणे, अपघात आदी समस्या निर्माण होऊन वेळ, इंधन व पैशांचा अपव्यय होतो. हे सर्व टाळण्यासाठी नगर- पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.
हे ही वाचा : नेवाशात झाला गडाखांच्या नव्या पिढीचा 'उदय'
या वेळी माजी नगरसेवक विजय गव्हाळे, संभाजी पवार, ए.एन.शर्मा, रामेश्वर मीना, आर.के.बावडे, महेश सुपेकर, खलिल मन्यार, नंदू लांडगे आदी उपस्थित होते.