नेवाशात झाला गडाखांच्या नव्या पिढीचा 'उदय'

विनायक दरंदले
Wednesday, 13 January 2021

मंत्री गडाखांवर पद व उस्मानाबाद जिल्हा पालकमंत्री पदाचा मोठा व्याप असल्याने तालुक्यातील ग्रामपंचायत रणधुमाळीत त्यांचे चिरंजीव उदयन चमकत आहेत.

सोनई (अहमदनगर) : युवानेते उदयन शंकरराव गडाख यांनी नेवासे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सक्रीय होत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखांचा भार हलका केला आहे. सर्वत्र त्यांच्या नेतृत्व गुणाचे कौतुक होत आहे.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

मंत्री गडाखांवर पद व उस्मानाबाद जिल्हा पालकमंत्री पदाचा मोठा व्याप असल्याने तालुक्यातील ग्रामपंचायत रणधुमाळीत त्यांचे चिरंजीव उदयन चमकत आहेत. यापुर्वीच त्यांनी केलेले युवा संघटन या निवडणुकीत संघटनेच्या यशासाठी मजबूत पाया असल्याचे बोलले जाते. उदयन आणि अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनिल गडाख यांनी सात ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली आहे.

जिल्हा परिषदेतील आगप्रतिबंधक यंत्रे कालबाह्य 

युवकांना एका छताखाली ठेवत त्यांनी उमेदवारी दिल्यानंतर झालेले सर्व रुसवे-फुगवे अतिशय कौशल्याने हताळले. आवश्यक तेथे मंत्री गडाखांची मदत घेतली. जेष्ठांच्या भेटी घेत त्यांनी राजकारणात आपल्या अष्टपैलू कामाची चुणूक दाखवली. जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या विधायक कामाला आदर्श समजत त्यांनी तालुक्यात सुरु केलेल्या कामाची वाहवा होत असून निवडणूक निकालानंतर या युवा नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर शिक्कामोर्तब होईल एवढे मात्र नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth leader Udayan Shankarrao Gadakh has become active in the Gram Panchayat elections in Nevasa taluka