उडीद, तूरसाठी तत्काळ हमी भाव खरेदी केंद्र सुरु करा; मनसेची मागणी

निलेश दिवटे
Monday, 14 September 2020

शासकीय हमी भावाने उडीद, तूर यांच्या खरेदीसाठीचे केंद्र तत्काळ सुरू करावे, या मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने तहसीलदार नानासाहेब आगळे यांना देण्यात आले.

कर्जत (अहमदनगर) : शासकीय हमी भावाने उडीद, तूर यांच्या खरेदीसाठीचे केंद्र तत्काळ सुरू करावे, या मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने तहसीलदार नानासाहेब आगळे यांना देण्यात आले.

या वेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र सुपेकर, शहराध्यक्ष नामदेव थोरात, तालुका उपाध्यक्ष प्रसाद मैड, सूर्यकांत कोरे, आबा उघडे, गणेश मराठे आदी उपस्थित होते. आपली मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे कळविण्यात येईल, असे आश्वासन आगळे यांनी दिले. 

सुपेकर म्हणाले, ""कोरोनामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मोठ्या कष्टाने पिकविलेल्या उडदाला तुलनेत कमी भाव मिळत आहे. त्यामुळे हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी आहे. याबाबत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.'' नामदेव थोरात यांनी आभार मानले.  

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS demands to start guarantee price center in loans