

Raj Thackeray addressing party leaders in Mumbai, alleging 96 lakh fake voters in Maharashtra ahead of the 2025 elections.
esakal
मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र, त्यापू्र्वी अहिल्यानगरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील मनसेचे दोन उमेदवार बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक १७ मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग अशी गायब झालेल्या उमेदवारांची नावे आहेत. या उमेदवारांचा शोध घेतला जात असून त्यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. दरम्यान, याबाबत अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती आहे.