esakal | मोबाईलच ओळखेल बनावट नोटा, आरबीआय काय म्हणतेय...
sakal

बोलून बातमी शोधा

The mobile app will detect counterfeit notes

हा अ‍ॅप महात्मा गांधी शृंखला तथा महात्मा गांधी (नई) शृंखला च्या नोटांच्या पुढच्या किंवा मागील भागाची तपासणी करून नोटांची ओळख पटवंण्यास सक्षम आहे.

मोबाईलच ओळखेल बनावट नोटा, आरबीआय काय म्हणतेय...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर ः नोटबंदीमुळे आपल्या देशात गोंधळ उडाला होता. त्यातल्या त्यात पाचशे रूपयांच्या नोटा बदलण्यावरून लोकांच्या रांगा लागल्या होत्या. मोठ्या किंमतीच्या नोटा जर बनावट असल्या तर सर्व सामान्यांचे मोठे नुकसान होते. परंतु असे काही मोबाईल अॅप आहेत, ते बनावट नोटा ओळखतात. त्यामुळे आपले नुकसान टाळता येईल. 

आरबीआयचे म्हणणे आहे की, मोबाईल एडेड नोट आयडेंटिफायर (मोबाइल फोनच्या मदतीने नोटची ओळख पटवणारा) – (मनी) एक अ‍ॅप आहे. परंतु हे अ‍ॅप दृष्टिहीन लोकांसाठी आहे. एकदा हा विनामूल्य अ‍ॅप इंस्टॉल केल्यानंतर इंटरनेटची आवश्यकता नाही.

हा अ‍ॅप महात्मा गांधी शृंखला तथा महात्मा गांधी (नई) शृंखला च्या नोटांच्या पुढच्या किंवा मागील भागाची तपासणी करून नोटांची ओळख पटवंण्यास सक्षम आहे.

वेगवेगळ्या कोनातून वेगवेगळ्या प्रकाशाच्या परिस्थितीत (सामान्य प्रकाश / डेलाईट / लो लाइट इत्यादी) ठेवलेल्या अर्ध्या दुमडलेल्या नोट्सदेखील ओळखू शकतात. हा मोबाइल अ‍ॅप नोट बनावट असल्याचे सिद्ध करीत नाही.

असा आहे आरबीआयचा मनी अ‍ॅप : गेल्या वर्षी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) दृष्टिबाधित व्यक्तींसाठी मोबाइल एडिड नोट आइडेंटिफायर (MANI) अॅप सुरू केले. हे अ‍ॅप नोटेचे मूल्य किती आहे हे जाणून घेण्यास मदत करतात. यामध्ये त्याचे मुद्रण, नोट आकार, नमुना इ. समाविष्ट आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अंधांच्या भारतीय नोटांची सुलभता वाढली आहे.

यामुळे त्यांना दररोजच्या व्यवहारात मदत होईल. 6 जून, 2018 रोजी रिझर्व्ह बँकेच्या डेवलपमेंट एंड रेगुलेटरी पॉलिसीच्या निवेदनात MANI अ‍ॅपबद्दल जाहीर करण्यात आले.