esakal | मोबाईल व्हॅन आली अन्‌ इंधना वाचून उभी राहिली; नगर जिल्ह्यातील प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

Mobile vans stopped from the Animal Husbandry Department in Nagar district

पशुसंवर्धन विभागातर्फे मुख्यमंत्री स्वास्थ योजनेंतर्गत फिरता दवाखान्याची मोबाईल व्हॅन जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली आहे. या व्हॅनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पशुधनासाठी दारात उपचार उपलब्ध होणार आहेत.

मोबाईल व्हॅन आली अन्‌ इंधना वाचून उभी राहिली; नगर जिल्ह्यातील प्रकार

sakal_logo
By
दौलत झावरे

नगर : पशुसंवर्धन विभागातर्फे मुख्यमंत्री स्वास्थ योजनेंतर्गत फिरता दवाखान्याची मोबाईल व्हॅन जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली आहे. या व्हॅनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पशुधनासाठी दारात उपचार उपलब्ध होणार आहेत. मात्र ही व्हॅन चालविण्यासाठी चालकासह इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती व वाहनासाठी लागणारे इंधनाची तरतूद अद्याप झालेली नसल्याने हे पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात उभे आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पशुपालकांना त्यांच्या जनावरांवर उपचार त्यांच्या घरीत उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे प्रयत्न सुरु आहेत. याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री स्वास्थ योजनेंतर्गत फिरता दवाखान्यासाठी सरकारने मोबाईल व्हॅन प्रत्येक जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यास सुरवात केलेली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील तेरा तालुक्‍यातून प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आलेले असून त्यातील कर्जत तालुक्‍यासाठी मोबाईल व्हॅन उपलब्ध झालेली आहे. उर्वरित तालुक्‍यांचे प्रस्ताव मंजूर झालेले असून टप्प्या टप्प्याने हे वाहने उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यात कर्जत तालुक्‍याने आघाडी घेतली असून दुसऱ्या टप्प्यात श्रीगोंदे व नेवासे तालुक्‍याचा समावेश आहे. 

हेही वाचा : बापरे! सोशल मीडियावर कोरोनाबाधितांच्या याद्या; रुग्णांसह नातेवाईकांना मनस्ताप
कर्जत तालुक्‍यासाठी आलेली मोबाईल व्हॅन इंधन व कर्मचारी नसल्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून उपायुक्त कार्यालयात उभी आहे. या व्हॅनमुळे मात्र शेतकऱ्यांना आपल्या दारातच पशुधनावर उपचार करता येणार आहेत. तसेच या व्हॅनच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहविणे शक्‍य होणार आहे. या व्हॅनमुळे शेतकऱ्यांच्या घरीच जनावरांवर शस्त्रक्रिया करणे शक्‍य होणार असून जनावरांच्या रक्ताची तपासणीही एकाच ठिकाणी होणार आहे. त्याचा पशुधन मालकांना फायदा होणार आहे. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्‍यांसाठी मोबाईल व्हॅन मिळावी, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. 

जिल्ह्यात 16 लाख 40 हजार गाय व म्हैस वर्ग आहे. सध्या जिल्ह्यातील नेवासे तालुक्‍यात लम्पी स्किन डिसीज या आजाराने शिरकाव केलेला आहे. जिल्ह्यात त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असल्यामुळे सर्वच तालुक्‍यांमध्ये राज्य शासनाने त्वरीत उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त आजिनाथ थोरे म्हणाले, मोबाईल व्हॅन उपलब्ध झालेली असून त्यावरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्वरीत केली जाणार आहे. या व्हॅनमुळे शेतकऱ्यांना जनावरांवर त्वरीत उपचार करणे शक्‍य होणार आहे. या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती देणे सोपे होणार आहे.
 
मोबाईल व्हॅनचे फायदे 

  • शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यास मदत होणार आहे. 
  • ऍडीओ व व्हीडीओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणार 
  • जागेवर जनावरांच्या सर्व वैद्यकीय तपासणी होणार 
  • वाहनावरील चालक कंपाऊंडची भूमिका बजावणार 
  • रोज किमा 70 किमी अंतरातील जनावरांची तपासणी होणार 
  • आठवड्यातून पाच दिवस वाहन ग्रामीण भागात फिरणार 
  • तपासणीनंतर जागेवरच जनावरांना औषधे मिळणार 

संपादन : अशोक मुरुमकर