मोदी सरकारकडून कोरोनाचा खंबीरपणे मुकाबला : विखे 

सतीश वैजापूरकर
बुधवार, 1 जुलै 2020

""घटनेतील 370वे कलम व तिहेरी तलाक रद्द करणे, अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीचा प्रारंभ, असे महत्त्वाचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतले. कोरोनाच्या संकटाचा खंबीरपणे मुकाबला केला. चीनच्या घुसखोरीला जशास तसे उत्तर देण्याची धमक दाखविली. मोदी सरकार हे खंबीर सरकार आहे,'' असे प्रतिपादन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. 

शिर्डी ः ""घटनेतील 370वे कलम व तिहेरी तलाक रद्द करणे, अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीचा प्रारंभ, असे महत्त्वाचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतले. कोरोनाच्या संकटाचा खंबीरपणे मुकाबला केला. चीनच्या घुसखोरीला जशास तसे उत्तर देण्याची धमक दाखविली. मोदी सरकार हे खंबीर सरकार आहे,'' असे प्रतिपादन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. 

हेही वाचा रेकॉड ब्रेक : नगर जिल्ह्यात दिवसभरात 43 कोरोना रुग्ण 

जनसंवाद अभियानाचा प्रारंभ विखे पाटील यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष अर्चना कोते, विजय कोते, नितीन कोते, उद्योजक विलास (आबा) कोते, जगन्नाथ गोंदकर, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, शिवाजी गोंदकर, ज्ञानेश्‍वर गोंदकर आदी उपस्थित होते. 
जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर म्हणाले, ""संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची व्हर्च्युअल सभा उत्तर नगर जिल्ह्यात तीन लाख लोकांनी पाहिली. माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड व सीताराम भांगरे यांच्या पुढाकारातून उत्तर नगर जिल्ह्यात जनसंवाद अभियान राबविले जात आहे. 

आवश्‍य वाचा फेरफार नडली : मंडलाधिकारी आव्हाड व तलाठी कैदके निलंबित 

भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. अशोक इथापे, नितीन दिनकर, सुनील वाणी, नंदकुमार जेजूरकर, साहेबराव रोहोम, राजेंद्र सांगळे, कैलास खैरे, अशोक पवार व किरण बोरुडे तालुकानिहाय जबाबदारी सांभाळत 9आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi government is a strong government: Vikhe