नगर : सेंट्रल बँकेच्या त्या शाखेतून पैसे मिळणार परत

नगर : सेंट्रल बँकेच्या त्या शाखेतून पैसे मिळणार परत
Updated on

टाकळी ढोकेश्वर (जि.अहमदनगर) : वडझिरे (ता. पारनेर) येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत बँकमित्र म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने अनेकांचे पैसे बँकेत न भरता फसवणूक केली. याबाबत आमदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माहिती-तंत्रज्ञान अध्यक्ष जितेश सरडे यांच्या नेतृत्वाखाली खातेदारांनी आंदोलन केले. याबाबत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. ३० सप्टेंबरपर्यंत खातेदारांना रक्कम परत देण्यात येईल, असे लेखी आश्वासन तीत दिले, अशी माहिती सरडे यांनी दिली.

नगर : सेंट्रल बँकेच्या त्या शाखेतून पैसे मिळणार परत
पदवी प्रमाणपत्रासाठी मागितली लाच; प्राचार्यासह लिपिक एसीबीच्या जाळ्यात

बँकेच्या कामात ज्येष्ठ नागरिकांना मदत व्हावी, यासाठी बँकमित्र म्हणून बँकेने एका कर्मचाऱ्याची नेमणूक केली होती. मात्र, त्याने फसवणूक केली. खातेदारांनी बँकेत याबाबत विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर, खातेदारांना ३० सप्टेंबरपर्यंत पैसे देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. बँकमित्र कर्मचाऱ्याने खोट्या स्वाक्षऱ्या करून ६० ते ७० लाखांचा गैरव्यवहार केला. याबाबत काही खातेदारांनी पारनेर पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रारी दिल्या. यात खातेदारांची काहीच चूक नाही. त्यांची रक्कम त्यांना त्वरित मिळावी. - जितेश सरडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस माहिती-तंत्रज्ञान अध्यक्ष

नगर : सेंट्रल बँकेच्या त्या शाखेतून पैसे मिळणार परत
दारूची नशा पडली महागात; अखेर खाल्ली जेलची हवा..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shirdi Sweet Shop Under Scanner After Fungus Detected in Chiranjeev Peda
Farmer Asked to Pay ₹1.2 Lakh to Receive Land Acquisition Compensation; Two Held
Rahuri-Shani Shingnapur Railway Project Sparks Outrage Over Farmland Acquisition
Pandharpur Wari Reaches the World Stage with Landmark London Launch
Marathi News Esakal
www.esakal.com