
Shevgaon, Shrigonda and Karjat battered by floods; river waters submerge homes, families displaced.
Sakal
अमरापूर : गर्भगिरी डोंगररांगेत रविवारी रात्री व पहाटे झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने वृध्दा, ढोरा, नांदणी, सकुळा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे वाघोली, वडुले, ढोरजळगाव, आपेगाव, आखतवाडे, मळेगाव, सामनगाव येथील रहिवाशी वस्त्यांमध्ये पाणी शिरले. गावातील अनेक कुटंबाची घरेदारे, संसारोपयोगी साहित्य, धान्य, जनावरे पाण्याखाली गेले.