

Political activity rises in Jamkhed after 3 ZP and 6 PS divisions are reserved; more aspirants expected.
Sakal
-संतराम सूळ
जामखेड: तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तीन गट आणि पंचायत समितीचे सहा गणांचे आरक्षण सोमवारी (ता.१३) जाहीर झाले. तालुक्यातील तिन्ही गटांत इच्छुकांची संख्या वाढणार असल्याचे चित्र आहे. जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तीन आणि पंचायत समितीचे सहा गणांचे आरक्षण जाहीर झाले. तहसील कार्यालयाच्या सभागृहात प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी याबाबतचे आरक्षण जाहीर केले. यावेळी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे, नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे, सचिन आगे उपस्थित होते.