
पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत असल्याची टीका आमदार संग्राम जगताप यांनी केली.
अहमदनगर : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पेट्रोल पंपावरील मशीनला चपलांचा हार घालण्यात आला. कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत असल्याची टीका आमदार संग्राम जगताप यांनी केली.
हे ही वाचा : वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक संकटात
युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, महिला आघाडीच्या अध्यक्ष रेश्मा आठरे, सुरेश बनसोडे, गजानन भांडवलकर, वैभव ढाकणे, अंजली आव्हाड, साधना बोरुडे, नगरसेवक समद खान, अमोल गाडे, प्रकाश भागानगरे, अजिंक्य बोरकर, विनित पाऊलबुद्धे, सुनील त्रिंबके, आरिफ शेख आदी उपस्थित होते.
अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जगताप म्हणाले, केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसची दरवाढ केल्याने सर्वसामान्यांना फटका बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निम्म्यापेक्षा कमी झालेल्या असताना पेट्रोलचे भाव निम्म्यावर येणे अपेक्षित होते; परंतु केंद्र सरकारने त्यावर 50 टक्क्यांपेक्षा अधिक कर लावून लोकांना पेट्रोल-डिझेल स्वस्त दरात मिळू दिले नाही. गॅस सिलिंडरच्या किंमती 400 रुपयांवरून 800 रुपयांपर्यंत नेल्या. वाढत्या महागाईमुळे सामान्य जनता हताश झाली आहे.