esakal | राहुरी : दोघा भावांचे मृतदेह पाहून आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
sakal

बोलून बातमी शोधा

मृतदेह

दोघा भावांचे मृतदेह पाहून आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

राहुरी (जि. अदमगनगर) : शहरात काल (मंगळवारी) दुपारी गणपती घाटाजवळ मुळा नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलांचे मृतदेह आज (बुधवारी) पाण्यावर तरंगताना आढळले. मृत सख्खे भाऊ होते. मृत मुलांना पाहून आईने फोडलेला हंबरडा उपस्थितांचे काळीज चिरून गेला.


अमर चंद्रकांत पगारे (वय १५) व सुमित चंद्रकांत पगारे (वय १२, रा. लोहार गल्ली, राहुरी) अशी मृतांची नावे आहेत. काल दुपारी एक वाजता लोहार गल्लीतील पाच मुले मुळा नदी पात्रात पोहोण्यासाठी गेले होते. पैकी, अमर व सुमित पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. इतर तिघेजण थोडक्यात बचावले. काल दुपारपासून नदीपात्रात शोधकार्य सुरु होते. परंतु, रात्री अंधार होईपर्यंत मुलांचा शोध लागला नव्हता. त्यामुळे, शोधकार्य थांबविले होते. आज (बुधवारी) सकाळी सव्वासात वाजता गणपती घाट परिसरात बुडालेल्या ठिकाणापासून सुमारे दोनशे फूट अंतरावर अमरचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. बाळासाहेब पवार, चंद्रकांत माळी, भागवत आहेर, गोविंद पवार, राजेंद्र नारद, विशाल राऊत या तरूणांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

हेही वाचा: सख्ख्या भावंडांवर नियतीचा घाला; आई आणि बहिणीचा एकच आक्रोश

सकाळी अकरा वाजता सुमितचा मृतदेह तनपुरेवाडी रोड, व्यंकटेश नर्सरी परिसरात गाडेकर यांच्या शेती जमिनीलगत मुळा नदीपात्रातील पाण्यावर तरंगताना आढळला. देवा कर्डक, सुरेश वाघ, फुलसौंदर, आलम शेख व स्थानिक तरुणांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. राहुरी ग्रामीण रुग्णालयात दोन्ही मृतदेह ठेवण्यात आले. यावेळी मृत मुलांची आई, बहिण व नातेवाइकांनी हंबरडा फोडला. तेंव्हा उपस्थितांच्या काळजाचे पाणी झाले.

हेही वाचा: राहुरीत पावसाचा हाहाकार! अनेक गावांचा संपर्क तुटला

loading image
go to top