
MP Nilesh Lanke inspecting crop losses in Pathardi; assures farmers of full support.
Sakal
पाथर्डी: खासदार नीलेश लंके यांनी सलग दुसऱ्या दिवशी तालुका दौरा करत पिंपळगाव टप्पा, चिंचपूर इजदे, कुत्तरवाडी, आल्हणवाडी, घुमटवाडी गावांना भेट देत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मी तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे लंके यांनी यावेळी सांगितले.