sakal
पारनेर : अहिल्यानगर जिल्ह्यात सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने मतदारसंघात बागायती शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. संबंधित शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेले विशेष पॅकेज नेमके कुठे अडकले, असा सवाल खासदार नीलेश लंके यांनी संसदेत उपस्थित केला.