Nilesh Lanke: नगरमध्ये राडा! खासदार निलेश लंकेच्या PAवर हल्ला, विखे समर्थकांनी भररस्त्यात फोडली गाडी अन्...

Nilesh Lanke PA: अहमदनगर लोकसभा निवडणूक जिंकलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांच्या पीएवरती जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
mp Nilesh lanke pa Rahul Zaware attack on road in ahamadnagr loksabha marathi news
mp Nilesh lanke pa Rahul Zaware attack on road in ahamadnagr loksabha marathi news Esakal

अहमदनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभेच्या निकालानंतर निलेश लंके आणि सुजय विखे यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला आहे. यामध्या निलेश लंके यांचे स्विय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये लंकेंचे पीए राहुल झावरे जखमी झाले आहेत. अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यानंतर दोनच दिवसांमध्ये नगरमध्ये लंकेंच्या पीएवरती जीवघेणा हल्ला झाला आहे. हल्ल्यामध्ये राहुल झावरे जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीनंतर पारनेरमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती आहे. यावेळी विद्यमान खासदार सुजय विखे आणि नवे खासदार निलेश लंके समर्थक आमने सामने आल्याची माहिती आहे. खासदार निलेश लंके यांच्या स्विय सहाय्यक राहुल झावरे यांच्यावर यावेळी प्राण घातक हल्ला झाला. सुजय विखे समर्थक विजय औटीसह आठ ते नऊ जणांनी केला हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

mp Nilesh lanke pa Rahul Zaware attack on road in ahamadnagr loksabha marathi news
Ahmednagar Constituency Lok Sabha Election Result : विखेंना मोठा धक्का! नगरकरांनी दिली निलेश लंकेंना दिल्लीत जनतेचे प्रश्न मांडण्याची संधी

या हल्ल्यात राहुल झावरे यांची गाडी फोडून त्यांना मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीमध्ये झावरे किरकोळ जखमी झाले त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

mp Nilesh lanke pa Rahul Zaware attack on road in ahamadnagr loksabha marathi news
Nilesh lanke: नगरमध्ये रात्रीस खेळ चाले! मतदानाच्या आधी पैशांचा पाऊस? BJPनं पैसे वाटल्याचा लंकेंचा दावा; video viral

लोकसभेची आकडेवारी समोर आली आहे. विखेंची सत्ता असलेल्या अहमदनरगमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निलेश लंके विजयी झाले आहेत. या मतदारसंघात भाजप विरूध्द राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात लढत झाली. यामध्ये लंकेनी मोठा विजय मिळवला आहे.

निलेश लंके- ६,२४,७९७

सुजय विखे- ५,९५,८६८

विजयी उमेदवाराचे मताधिक्य- २८,९२९

mp Nilesh lanke pa Rahul Zaware attack on road in ahamadnagr loksabha marathi news
Ashish Shelar: मविआला 18 जागा मिळाल्या तर संन्यास घेतो म्हणणाऱ्या आशिष शेलारांचा घुमजाव, म्हणाले, आधी...

भाजपकडून म्हणजेच महायुतीकडून अहमदनगरसाठी सुजय विखेंना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना उमेदवारी दिली होती. २०१९ च्या निवडणुकीत डॉ. विखे यांच्या विरोधात आमदार संग्राम जगताप अशी लढत झाली होती. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com