sakal
पारनेर : सुपे औद्योगिक वसाहत गेल्या काही वर्षात औद्योगिकदृष्ट्या वेगाने विकसित होणारी वसाहत ठरली आहे. या वसाहतीतील वाढत्या उद्योगांमुळे विविध सुविधा, सुरक्षेचे प्रश्न, कामगार समस्या आणि प्रशासकीय समस्या उदभवत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी शुक्रवारी नव्या व जुन्या औद्योगिक वसाहतींमधील कंपनी व्यवस्थापकांशी संवाद साधत विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.