
अहिल्यानगर : खासदार नीलेश लंके यांनी महानगरपालिका कार्यालयात मंगळवार आढावा बैठक घेतली. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सफाई कामगार, नेहरू मार्केट, भाजी विक्रेते, गॅस पाईपलाईन, गाळेधारकांची भाडेवाढ, अशा अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. सफाई कामगारांच्या नोकरीचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, तसेच गॅस पाईपलाईनचे काम चार महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी खासदार लंके यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत.