esakal | विखे-राजळे एकाच व्यासपीठावर आले पण… | Ahmednagar
sakal

बोलून बातमी शोधा

mp sujay vikhe and mla monica rajale

विखे-राजळे एकाच व्यासपीठावर आले पण…

sakal_logo
By
टीम-ईसकाळ


पाथर्डी (जि. अहमगनगर) : अनेक दिवसांच्या कालखंडानंतर एकमेकांवर नाराज असलेले खासदार डॉ. सुजय विखे व आमदार मोनिका राजळे हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आल्याने भाजप वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला. खासदार व आमदार गटात राजकीय मनोमिलन झाले की पक्षीय कार्यक्रमानिमित्त हे दोघे एकत्र आले, हे मात्र समजू शकले नाही.


मध्यंतरी झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे व राजळे गटात दुरावा निर्माण झाला होता. या निवडणुकीत राजळे यांना विश्‍वासात न घेता विखे यांनी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांना उमेदवारी दिली होती. आपल्याला विश्वासात न घेता ही उमेदवारी विखे यांनी जाहीर केल्याने या दोघांत दुरावा निर्माण झाला होता. निवडणुकीत आव्हाड यांनी माघार घेतली असली, तरीही त्यानंतर विखे व राजळे यांनी एकही एकत्रित कार्यक्रम घेतला नव्हता. विखे हे त्यानंतर अनेकदा तालुक्यात आले. मात्र राजळे त्यांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या नव्हत्या, तर राजळे यांनीही अनेक कार्यक्रम घेतले. त्यासाठी त्यांनी विखे यांना बोलावले नव्हते.


विखे यांच्या पुढाकारातून स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सव व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात दोन दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या निमित्ताने विखे व राजळे आज एकत्र आले. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी मोठा हार घालून त्यांचे स्वागत केले. दोघांनीही भाषणबाजी टाळत रुग्ण व आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत निघून जाने पसंद केले.

हेही वाचा: दोघा भावांचे मृतदेह पाहून आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश


दुसऱ्यांदा छापल्या कार्यक्रम पत्रिका

शिबिरासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या कार्यालयातून अगोदर ज्या पत्रिका छापण्यात आल्या, त्या पत्रिकेवर आमदार राजळे यांचे छायाचित्र टाकण्यात आले नसल्याने राजळे समर्थक नाराज झाले होते. ही नाराजी समजल्यानंतर विखे यांच्या कार्यालयातून पुन्हा वेगळ्या पत्रिका छापण्यात आल्या. त्यावर राजळे यांचे छायाचित्र छापण्यात आले.

हेही वाचा: तरुण पिढीने जाणकारांशी सुसंवाद साधावा! - शरद पवार

loading image
go to top