esakal | कोव्हिड सेंटरला सर्वोतोपरी सहकार्य करणार : खासदार सुजय विखे

बोलून बातमी शोधा

MP sujay vikhe patil visited and inspected the covid centre at bhalwani

खा.विखे म्हणाले की, आ .लंके यांनी कोव्हिड महामारीच्या काळात सुरू केलेल्या कामामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून या केंद्रामुळे शासकिय यंत्रणेवरील ताणही कमी झाला आहे.

कोव्हिड सेंटरला सर्वोतोपरी सहकार्य करणार : खासदार सुजय विखे
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

भाळवणी (अहमदनगर) : आमदार निलेश लंके यांनी भाळवणी येथे पारनेर नगर मतदार संघातील लोकांसाठी सुरू केलेले कोव्हिड केंद्र कौतुकास्पद व राज्यातील सर्व नेत्यांनी आदर्श घेण्यासारखे असून या केंद्रासाठी जी काही मदत आवश्यक आहे, ती पूर्ण करून लागेल ते सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन खासदार सुजय विखे पाटील यांनी केले.

हेही वाचा: राळेगणसिद्धी : महिला शेतकऱ्याची 'कूल' आयडिया, कामगारांसाठी केला 'हा' प्रयोग

येथील शरदचंद्रजी पवार कोव्हिड केंद्राला आज खा.विखे यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे, सभापती गणेश शेळके, राहुल शिंदे, शिवसेना तालुकाध्यक्ष विकास रोहोकले, प्रमोद गोडसे, सूरज भुजबळ, नितीन मुरकुटे, दत्ता कोरडे, अभयसिंह नांगरे, विकास काकडे, संभाजी आमले, प्रा.बबन भुजबळ, नामदेव रोहोकले आदी उपस्थित होते.

हेही वाचा: कोरोनाचा कहर, शहरातून थेट बांधावर..!

खा.विखे म्हणाले की, आ .लंके यांनी कोव्हिड महामारीच्या काळात सुरू केलेल्या कामामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून या केंद्रामुळे शासकिय यंत्रणेवरील ताणही कमी झाला आहे. या परिस्थितीत सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून काम केले तर निश्चितपणे कोरोनाला लवकरच हद्दपार करता येईल. येथील स्वंयसेवक २४ तास रूग्णांची सेवा करीत असून त्यांनी वैयक्तिक काळजी घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी विखे यांनी दाखल रूग्णांशी संवाद साधून चौकशी केली.