एनसीसी विभागातील पाच विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात झाली निवड

सुनील गर्जे 
Sunday, 22 November 2020

ज्ञानेश्वर'च्या एनसीसी विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा उपक्रमासह व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे असे विविध उपक्रम राबवले जातात. त्यातूनच विद्यार्थी देश सेवेची प्रेरणा घेत सैन्य व पोलिस दलात दाखल होत आहेत.

नेवासे (अहमदनगर) : मुळा एज्युकेशन सोसायटीच्या नेवासे येथील श्री. ज्ञानेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय छत्र सेना (एनसीसी) विभागातील पाच विद्यार्थ्यांची भारतीय सैन्यदलात नुकतीच निवड झाली आहे. यानिवडीबद्दल महाविद्यालयाचा एनसीसी विभाग व यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक कर प्रमुख कॅप्टन प्रा.डॉ.सुभाष आगळे यांनी दिली.
 
नेवासे यासारख्या ग्रामीण भागातील श्री. ज्ञानेश्वर महाविद्यालयात 1974 मध्ये एनसीसी विभाग कार्यरत झाला. त्यानंतर या विभागातून अनेक विद्यार्थी सैन्य व पोलिस दलासह शासनाच्या विविध विभागात भरती झाले. तीच परंपरा आजही कायम सुरु आहे. ज्ञानेश्वर'च्या एनसीसी विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा उपक्रमासह व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे असे विविध उपक्रम राबवले जातात. त्यातूनच विद्यार्थी देश सेवेची प्रेरणा घेत सैन्य व पोलिस दलात दाखल होत आहेत.

हे ही वाचा : पाहून नवा 'हिरा', वाहिल्या अश्रूंच्या धारा; तरुणांनी ऊसतोड कामगारास दिला नवा बैल 
 
फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या भारतीय सैन्य दल भरती मैदानी व एक नोव्हेंबर रोजी झालेल्या लेखी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात 'ज्ञानेश्वर' महाविद्यालयाच्या एनसीसी विभागातील दशरथ फरे, विशाल तावरे, प्रवीण आगळे, ऋषिकेश कोरहाळे, अक्षय चव्हाण या पाच विद्यार्थ्यांची सैन्य दलात निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना एनसीसी विभागाचे प्रमुख कॅप्टन प्रा.डॉ.सुभाष आगळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. 

सैन्य दलात निवड झाल्याबद्दल या विद्यार्थ्यांचे मुळा उद्योग समूहाचे संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख, राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख, सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख, प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापूरे यांनी अभिनंदन केले. 

मुळा एज्युकेशनच्या ज्ञानेश्वर व सोनई कॉलेजच्या एनसीसी विभागाची कामगिरी कौतुकास्पद आहे. या विभागाचे मार्गदर्शन व निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत यातूनच हे यश मिळाले आहे. 
- डॉ. विनायक देशमुख, सह सचिव, मुळा एज्युकेशन सोसायटी, सोनई 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mr. Dnyaneshwar College Five students from NCC department of have been selected in the Indian Navy