‘महावितरण आपल्या दारी’ उपक्रमास पुणतांब्यात प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 December 2020

महावितरण आपल्या दारी उपक्रमाला पुणतांब्यात चांगला प्रतिसाद मिळाला. कंपनीच्या पथकाने घरोघरी जाऊन वीजग्राहकांच्या अडचणी समजून घेतल्या.

पुणतांबे (अहमदनगर) : महावितरण आपल्या दारी उपक्रमाला पुणतांब्यात चांगला प्रतिसाद मिळाला. कंपनीच्या पथकाने घरोघरी जाऊन वीजग्राहकांच्या अडचणी समजून घेतल्या.

नव्वद ते शंभर वीजग्राहकांच्या तक्रारींचे निवारणही झाले. वसुलीलाही ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. एका दिवसात एक लाख दहा हजारांची वीजबिल वसुली झाल्याची माहिती सहायक वीज अभियंता शीतलकुमार जाधव यांनी दिली. 

आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून राहाता तालुका वीज अभियंता दिनेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली "महावितरण आपल्या दारी' उपक्रम राबविण्यात आला. लघू दाब वाहिनी, उच्च दाब वाहिनी, ग्राहक वीज मीटर तक्रारी, सुरक्षा देखभाल आदी कामे करण्यात आली. वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता डी. डी. राठोड, धीरज भिंगारदिवे यांच्यासह वीज वितरण कंपनीचे नव्वद कर्मचारी कार्यान्वित होते. उपसरपंच संगीता भोरकडे यांनी वीजग्राहकांच्या तक्रारी मांडण्यास मोठी मदत केली.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL responds to your doorstep initiative