Video : मुंबईच्या नवरदेवाची वरात, कोपरगाव पोलिसांच्या दारात, हे आहे कारण

Mumbai's bride gets stuck in Kopargaon police station
Mumbai's bride gets stuck in Kopargaon police station

कोपरगाव : लॉकडाउन असताना कोपरगाव तालुक्यात एक विवाह झाला आहे. वधू तालुक्यातीलच मुर्शतपूरची तर नवरदेव मुंबईचा होता. परंतु  वधूपित्याने प्रशासनाला तो तालुक्यातीलच असल्याचे भासवले. रेड झोनमधून आलेले हे वऱ्हाड चक्क पोलिस ठाण्यात नेण्यात आलं. 

नवरदेव मुंबईचा असताना कोपरगावचा असल्याचे तहसीलदार यांना खोटे सांगून लग्नाची परवानगी घेणे, वऱ्हाडाने मुंबई येथून येताना शासनाची परवानगी न घेता किंवा ई-पास न घेता प्रवास केला. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपी उत्तम नबाजी भालेराव, राजू नारायण सरोदे, अलका राजू सरोदे, अमृत रवींद्र सरोदे, रमेश गोडू धायेकर (सर्व रा.माटुंगा लेबर कॅम्प ई वार्ड मुंबई.), रंजना विजय गायकवाड, शीतल विजय गायकवाड, सागर विजय गायकवाड (सर्व रा.अक्षदा केणे चाळ, मिलिंदनगर, कल्याण पश्चिम), आकाश राजू सरोदे, शुभम उत्तम भालेराव, संगिता उत्तम भालेराव, आश्लेषा उत्तम भालेराव, प्रेरणा उत्तम भालेराव (सर्व रा.मुर्शतपूर ता. कोपरगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुर्शदपूरचे तलाठी धनंजय गुलाबराव प-हाड यांनी फिर्याद दिली आहे.

तालुक्यातील मुर्शतपूर येथील उत्तम नबाजी भालेराव यांनी त्यांच्या मुलीचे लग्नास परवानगी मिळावी म्हणून तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याकडे 19 मे रोजी अर्ज केला. नवरदेव हांसुद्धा कोपरगाव तालुक्यातील असल्याचे खोटेच सांगितलं. तहसीलदार यांनी सहवीस मे रोजी लग्न करण्याची परवानगी अटी व शर्तीवर दिली.

ठरल्याप्रमाणे लग्नाचा दिवस जवळ आला. परंतु वऱ्हाड हे मुंबईवरून येणार असल्याची कुजबुज ग्रामस्थांमध्ये सुरू झाली. मुंबई येथून एम एच 05 डी एस 1307 व एम एच 01 3692 या क्रमांकाच्या गाडीतून तब्बल 12 ते 15 वऱ्हाडी गावात दाखल झाले.

तहसीलदार योगेश चंद्रे यांना ही मिळाली. पोलीस पाटील गोरख दवंगे ,ग्रामसेवक सुनील राजपूत ,ग्रामस्थ अनिल दवंगे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली असता वेगळेच चित्र दिसून आले. आज सकाळी 9 वाजता लग्न लावण्याचा विधी सुरू होता. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी अख्खे वऱ्हाडच पोलीस ठाण्यात आणले.

मुंबई येथून आलेल्या वऱ्हाडाने ई पासची सुविधा असताना तोही घेतलेला नव्हता. पोलिसांनी या सर्वांवर गुन्हा दाखल केला अाहे. शासनाच्या खोटी माहिती पुरविणे ,तसेच कोरोना प्रादुर्भाव संसर्ग कायद्याचे उल्लंघन ,जमाव बंदी कायद्याचे उल्लंघन तसेच शासनाच्या दळणवळण नियम व अटी शर्तींची उल्लंघन आदी कलमाअंतर्गत या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com